वादळी वारा आणि पावसामुळे कोसळली इमारत,दोन जखमी

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

आधीच कोरोना चे संकटामुळे हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असताना आज मालेगाव येथील धुळे रोड वर स्थित हॉटेल एकता च्या इमारतीचा पुढचा भाग वादळी वारा आणि पावसामुळे कोसळला घटनास्थळी अग्निशामक दल व पोलिसांमार्फत बचाव कार्य सुरू आहे या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून भेटली आहे.