
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.
