
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
नाशिक मधील देवळाली परिसरात असलेल्या एका हॉस्पिटल ने चक्क बिल वसूल करण्यासाठी पेशंट च्या हातातील बांगड्या च काढून घेतल्याचा प्रकार नाशिक मध्ये घडला आहे.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे, रोहन देशपांडे आणि टीम ला एक कॉल आला आणि पेशंटच्या नातेवाईकांनी बिला संदर्भात तक्रार केली तर ते बघण्यासाठी म्हणून गेलेल्या या कार्यकर्त्यांना खोलात गेल्यावर कळले की बिल दिले जावे म्हणून हॉस्पिटल प्रशासनाने या बांगड्या काढल्या तर भावे यांनी सवाल केल्यावर पोलीस स्टेशन ला जा आम्ही घाबरत नाही असे मुजोर पणाचे उत्तर डॉक्टर कडून मिळाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणें आहे तसा फेसबुक लाईव्हमध्ये देखील आले असल्याचे त्यांनी सांगितले.
आता पेशंट च्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन ला धाव घेतल्यावर त्याची शहानिशा व्हावी ही मागणी सर्व च स्तरातून होत आहे. जिथे लोकांचे आशीर्वाद घेण्याचे दिवस असून वैद्यकीय क्षेत्रातील काही लोक समान्यजनांचे शाप घेत आहेत अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.
