नाशिक च्या गंगाघटवरील ऐतिहासिक राम सेतू पूल पडणार ?

नाशिकच्या मध्यभागी असलेल्या गंगा घाटावर पांडे मिठाई शेजारी असलेल्या
ऐतिहासिक रामसेतू पूल पडण्याच्या घडामोडी सुरू असल्याचे पांडे मिठाई येथील कल्पना पांडे यांनी सांगितले. पुलाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून पूल अतिशय मजबूत आहे आणि थोडीफार डागडुजी करून पूल मजबूत होऊ शकतो ऐतिहासिक व्हिक्टोरिया म्हणजेच अहिल्याबाई होळकर पूल देखील अशाच प्रकारे डागडुजी करून मजबूत करण्यात आले आहे तरी दुरुस्ती करून पूल टिकवण्यात यावा आणि नाशिकच्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यव टाळावा अशी मागणी कल्पना पांडे यांनी केली आहे