
. नाशिक-कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर नाशिक येथे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला उपशिक्षक किशोर भारंबे यांनी संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन केले.त्यानंतर मुख्याध्यापक श्री आप्पा पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रसंगी उपमुख्याध्यापिका युगंधरा देशमुख, प्राथमिक विभागाच्या प्रमुख काकळीज मॅडम पर्यवेक्षक उमेश देवरे,जेष्ठ शिक्षिका आशा चौधरी, एस बी अहिरे घुले आप्पा प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.उपस्थितांना संबोधित करताना मुख्याध्यापक आप्पा पवार म्हणाले भारताला पारतत्र्यांतुन मुक्त करण्यासाठी ज्या महान विभुतींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस..कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन कविता सोनवणे यांनी केले.कार्यक्रमास दोन्ही विभागाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. Covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला
