कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवननगर येथे हर घर तिरंगा जनजागृती रॅली


स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सांतर्गत हर
घर तिरंगा जनजागृतीसाठी के.बी.एच.विद्यालय पवननगर येथे मा. मुख्याध्यापक आप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॅली काढण्यात आली. लेझीम पथक , स्काऊट, गाईड पथक , विविध वेशभूषा केलेले, घोषवाक्य व तिरंगा हातात घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सवाचे औचित्य साधून शाळेत दि.१०/८/२०२२ रोजी रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास मुख्याध्यापक आप्पा पवार , उपमुख्याध्यापिका युगंधरा देशमुख , पर्यवेक्षक ‌उमेश देवरे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता सोनवणे ,विद्या गिते ,,रोषनी पाटील , विजय निकम ,भिमसिंग पवार ,हिरे , साळुंखे व विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी यांनी मोलाचे सहकार्य केले.
रांगोळी व निबंध स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.