ब्रेकिंग न्यूज उद्या पासून खाजगी दवाखाने कोविड चे उपचार करणार नाहीत ?

प्रतिनिधी’:तेजस सोनार, नाशिक

आज नाशिक च्या हॉस्पिटल ओनर असोसिएशन ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहुन आम्हाला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती केली आहे. आणि यामध्ये हॉस्पिटल चे डॉक्टर आणि इतर कर्मचारी मानसिक आणि शारीरिक रित्या खूप थकले असून तसेच सरकारी यंत्रणा आता असलेल्या रुग्ण संख्येला सांभाळू शकतात असे सांगितले आहे आणि म्हणून आम्हाला या जबाबदारीतून मोकळे करावे अशी विनंती केली.
गरज भासल्यास पुन्हा सेवेत येऊ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे

या विनंतीवर शहरातल्या 172 हॉस्पिटल मालकांनी सह्या केल्या आहेत.