
आज लागलेल्या पाच राज्याच्या विधानसभेच्या निकालांमध्ये पंजाब मध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी बहुमतात विजय मिळवला आणि अपेक्षेपेक्षा तसेच एक्झिट पोल पेक्षा जास्त संख्येने आपचे आमदार पंजाब मध्ये निवडून आले आणि भगवंत मान यांच्या मुख्यमंत्रीपदावर पंजाबच्या जनतेने मोहर लावली याच विजयाचा जल्लोष देशभरात बरोबरच महाराष्ट्रातही बघायला मिळत आहे नाशिकच्या आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले विविध भागातील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारे जल्लोष केल्याचे चित्र संपूर्ण नाशिक शहरात बघायला मिळाले. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकारने वीज पाणी रस्ते आरोग्य शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये केलेल्या कामाची पावती म्हणूनच पंजाब जनतेने आम आदमी पार्टीचा पर्याय निवडला आणि भगवंत मान्यांना मुख्यमंत्री पदाची संधी पंजाबच्या नागरिकांनी दिली आहे असे मत आम आदमी पार्टीचे सुमित शर्मा यांनी मांडले आहे.
