इतिहास कालीन वारसा स्थळ तोडून नाशिक होणार का स्मार्ट सिटी ?

प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक

अहिल्यादेवी होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटसाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने गोपिकाबाई पेशवे यांच्या बंगला व दहन स्थळातील  तुळशी वृंदावन तोडत होते. देवांग जानी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर काम थांबवले. स्मार्ट सिटीचे एकंदरीत काम पहात..  ऐतिहासिक वारसा स्थळ जतन-संवर्धन करण्या ऐवजी स्मार्ट सिटी कंपनी तोडण्यात धन्यता मानत आहे. नाशिक नगरीच्या जडणघडणीत गोपिकाबाई यांचे मोठे योगदान आहे.

सदर प्रसंगी देवांग जानी, माजी आमदार बाळासाहेब सानप, स्मार्ट सिटी अधिकारी शोएब सय्यद, संजय पाटील व चिराग गुप्ता, देवेंद्रनाथ पंड्या, ऋतुल जानी उपस्थित होते.

” नाशिक सिटी सर्व्हे कार्यालयातील डीएलआर मॅपनुसार सदर जागा गोपिकाबाई पेशवे यांच्या बंगला म्हणून उल्लेख आहे. रेकॉर्ड ऑफ राईट्स मध्ये गोपिकाबाई यांचे नाव आहे. नाशिक शहराच्या इतिहास, भूगोल माहीत नसणारे शहराचे रचनाकार बनले आहेत. गोपिकाबाई यांचे निवासस्थान व दहन स्थळ यास धक्का न लावता पुढील कार्य करावे.”

~ गोदाप्रेमी देवांग जानी