
प्रतिनिधी:तेजस सोनार, नाशिक
आज नाशिक मध्येय दुपार पासून च इगतपुरी, कळवण, पेठ, सिन्नर या काही तालुक्यांमध्ये पावसाने अचानक सुरवात केली संध्याकाळच्या वेळेत नाशिक शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या आणि गार वारे वाहू लागले. आधीच कोविड 19 चा प्रभाव पुन्हा वाढू लागला असताना अचानक पावसामुळे सगळीकडे घबराटीचे वतावरण पसरले आहे. तसेच आजू बाजूच्या परिसरातील शेतकीरीही हवालदिल झाला आहे नुकताच द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे आणि द्राक्ष काढणीवर आहे आणि त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. अवकाळी पावसामुळे सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार बाळावण्याची शक्यता जास्त वाढते आणि त्यामुळे कोविड ची भीती अधिकच वाढणार आहे.
सटाणा बागलाण भागात डाळिंबालाही हानी होणार आहे काही ठिकाणी गहू काढून ठेवण्यात आला आहे त्यामुळे त्याचेही नुकसान होण्याची दाट शक्यता झाली आहे.
