
नाशिक शहरातील कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी लाखो रुपयांचे बिल रुग्णाच्या हाती दिले जात आहे यासाठी आम आदमी पार्टी चे भावे यांनी दोन दिवासाधी नग्न होत आंदोलन केले. रुग्णांची होणारी लूट रोखण्यासाठी आम आदमी पार्टी नाशिक सतत प्रयत्न करीत आहे.आज आम आदमी पार्टी नाशिक तर्फे मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.त्यात खालील प्रमुख मागण्या मान्य कराव्या अशी विनंती करण्यात आली.
मागण्या
1-कोरोनाचे साधी लक्षणे असलेल्या रुग्णांना गोळ्या औषधे तसेच इतर उपचार सुविधा घरीच उपलब्ध करून देण्यात यावी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारी व्यवस्था तयार करण्यात यावी.
2-खाजगी हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या करण्यात आलेल्या आर्थिक लुटी बाबत कारवाई करण्यात यावी तसेच सुरू असलेली लूट थांबविणे कामी उपाय योजना करण्यात यावी.
3-सरकारी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावे.
4-महाराष्ट्रात झालेल्या रेमडीसीवर घोटाळ्याचा तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
5-सरकारच्या अपुऱ्या उपचार सुविधेमुळे मरण पावलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी.
6-कोरोना तसेच म्युकरमायकोसिस च्या रुग्णावर सर्व रुग्णालयात मोफत उपचार करण्यात यावे.
7-महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा गाव ,शहर पातळीवर प्रचार प्रसार करण्यात यावा.
8-सर्व खाजगी हॉस्पिटलच्या दर्शनी भागात कोरोना व इतर आजाराचे दर पत्रक दर्शविणारे फलक लावण्यात यावे.
9-खाजगी हॉस्पिटलवर देखरेख करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याचे नाव व फोन नंबर असलेले फलक दर्शनी भागात लावण्यात यावे.
10-रुग्णाचे हकाची सनद फलक रुग्णालयाचे दर्शनी भागात लावण्यात यावे.
11-पॉलिसी धारकाकडून कुठलेही अनामत रक्कम घेण्यात येऊ नये असे आदेश खाजगी रुग्णालयांना देण्यात यावे.
12-रुग्णाची लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयावर गुन्हे दाखल करण्यात यावे.
13-ज्या रुग्णाचे लूट करून जास्त पैसे घेण्यात आलेले आहे ते रुग्णांना परत देण्यात यावे.
14-सरकारी रुग्णालयात रिक्त असलेल्या डॉक्टर , परिचारिका तसेच इतर कर्मचारी वर्ग यांची तातडीने भरती करण्यात यावी.
15- नाशिक मधील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेतलेल्या सर्व रुग्णाच्या बिलाची तपासणी करून लूट झालेल्या नागरिकाचे पैसे परत देण्यात यावे.
