

नाशिक येथील सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येऊन नाशीक च्या मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येऊन दिल्ली मध्ये सुरू असलेल्या आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मेधा ताई पाटकर यांचा नाशिक मध्ये दौरा होता. उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला संबोधित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उद्या मेधा ताई शेतकरयांना भेटतील सोबत नाशिक मधून राजू देसले, मुकुंद दीक्षित, सचिन माळेगावकर, इत्यादी कार्यकर्ते मदतीसाठी झटत आहेत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलन अधिक तीव्र व्हावे आणि जास्तीत जास्त पाठिंबा आंदोलनाला मिळावा यासाठी धुळे, नंदुरबार, जळगाव येथून शेतकरी नाशिक मध्ये येणार आहे आणि पुढे पुन्हा धुळे, शिरपूर, इंदोर या मार्गे दिल्लीला रवाना होणार आहे मध्ये काही ठिकाणी शेतकरी सभांचे नियोजन आहे.
