
शाकद्वीपय महिला मंडळ नाशिक यांनी झूम सभेच्या माध्यमातून रविवार ६ जून २०२१ रोजी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली ज्यामध्ये ६५ मुले सहभागी झाली, त्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची मुले होती.
(राजस्थान गुजरात विदर्भ छत्तीसगड सातारा सांगली औरंगाबाद नाशिक येथील होते) स्पर्धा रविवारी 6 जून रोजी सकाळी 12:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत होती. महासभा चे अध्यक्ष श्री सुधीरजी शर्मा श्री ललितजी बिजावत, श्री ओमजी शर्मा सौ पुष्पाबाई शर्मा, श्री सचिनजी शर्मा, श्री अमोलजी अबोटी श्री अनिलजी नहार यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि आपले मनोगत व्यक्त केले
आमच्या अध्यक्षा सौ चेतना सेवक, मीटिंग होस्ट बबिता शर्मा, प्रकल्प समन्वयक – शंभर लता शर्मा, प्रकल्प संचालक – अस्मिता शर्मा सौ कविता शर्मा, प्रकल्प प्रभारी – सौ संध्या शर्मा सौ मधुबाला शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला.
चित्रकला स्पर्धेची तपासणी परीक्षक श्री नितीनजी शेवाळे यांनी केली.
