
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पाँडेचेरी (पुद्दुचेरी)येथे 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून नेहरू युवा केंद्र नाशिक च्या वतीने राष्ट्रीय युवा स्वयंसेविका कु.प्राजक्ता मंडाले, दानिश शेख ,कु.अश्विनी जगदाळे याची निवड करण्यात आली आहे .स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी सदर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यामध्ये संपूर्ण भारतातील युवकांचा सहभाग असतो. यावर्षी 7500 युवकांची निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत त्यांच्या द्वारे केल्या गेलेल्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांना पाँडेचेरी (पुद्दुचेरी) येथील 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड करण्यात आले आहे .त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे आहे.त्यांना जिल्हा युवा अधिकारी मा.कमल त्रिपाठी , श्री.सुनील पंजे , श्री .दिलीप आहेर आंदिचे मार्गदर्शन लाभले.
