


राष्ट्रवादी, काँग्रेस ,आम आदमी पार्टी, छावा क्रांतिवीर सेना , छात्रभारती, कम्युनिस्ट पार्टी चा सहभाग
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र या विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नव्हते. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी शांत का आहेत? असे प्रश्न उपस्थित होत होते, परंतु शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केल्यानंतर मात्र महाराष्ट्रात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकरी आंदोलनात उतरले आहे. दरम्यान नरेंद्र मोदी सरकारनी जे कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
नाशिक सीबीएस येथे ठिया आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शेतकऱयांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध “मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याच पाहिजे, मोदी सरकारच करायच काय ? खाली डोके वरती पाय, भारत माता की जय” ,मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद म्हणत शेकडो शेतकरी रस्त्यावर होते.करण गायकर छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष, शिवाजीराजे मोरे प्रदेश महासचिव मनोहर मुसळे,अर्जुन शिरसाठ ,भारत पिंगळे,अस्मिता देशमाफने, कुंदन हिरे,गणेश दळवी हे उपस्थित होते.
