
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
नाशिकमध्ये 4 दिवसापासून सुर्यनारायनाचे दर्शन झालेले नाही. बऱ्याच दिवसानंतर हा अनुभव नाशिक करांना मिळाला आहे , शहरी भागात लोक या अपरिस्थितीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. परंतु त्याच बरोबर द्राक्ष शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेला आहे. पडणारी थंडी आणि धुके हे पिकासाठी धोक्याची घंटा आहे पुढील महिन्यापासून द्राक्ष हाती येण्याचा सुरू होईल आणि अशा परिस्थितीत थंडी मुले द्राक्ष मण्याला तडे जाण्याची शक्यता असते आणि द्राक्ष मणी गळून पडण्याची दाट शक्यता आहे. नाशिक हे द्राक्षाची मोठी बाजारपेठ आहे परंतु डोळ्यासमोर दिसणाऱ्या या नुकसानाची शक्यतेमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलं आहे करोडो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे
