
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय ना श्री छगनरावजी भुजबळ साहेब व मा.खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ,प्रदेश उपाध्यक्ष नाना साहेब महाले, युवक प्रदेश अध्यक्ष मा. मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शना खाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशसरचिटणीस मा.श्री दिलीप (आण्णा) खैरे. शहर अध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे युवकचे शहराध्यक्ष मा श्री अंबादास (नाना) खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज माऊली लॉन्स, DGP नगर ह्या भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नविन नाशिक कडून केंद्र सरकारचा पेट्रोल व डिझेल महागाईविरोधात कोरोना चे नियम पाळून निषेध म्हणून गुलाबाचे फुलं व मोदींचे लॉलीपॉप देऊन आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी नविन नाशिक कार्याध्यक्ष राहुल कमानकर ,शहर संघटक अक्षय पाटील, करण आरोटे, अविनाश मालुंजकर, अमोल धांडे, उमेश कुंभेकर, भूषण दिक्षित, प्रसाद हिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
