नविन नाशिक सकल मराठा समाज तसेच शिवप्रेमी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना बाबत निषेध सभेचे आयोजन

नविन नाशिक सकल मराठा समाज तसेच शिवप्रेमी यांच्या वतीने कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना बाबत पाथर्डी फाटा येथील दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते

    

नविन नाशिक सकल मराठा समाज तसेच शिवप्रेमी यांच्या वतीने कर्नाटकमध्ये झालेल्या
आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना बाबत नविन नाशिक सकल मराठा समाज तसेच सर्व शिवप्रेमी यांच्या वतीने पाथर्डी फाटा येथील दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ निषेध म्हणून मुक आंदोलन करण्यात आले.
यावेळी दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस महिला भगिनि वंदना ताई पाटिल,देवयानी पाटिल यांच्या कडून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी करण जी गायकर यांनी निषेध नोंदवून अखंड हिंदुस्थानाचे दैवताची विटंबना करणाऱ्या शिवद्रोही वर तात्काळ कारवाईचे आदेश करून त्यांच्या वर कठोर कारवाई करावी…
तसेच शिवरायांची विटंबना करणाऱ्याला पाठीशी घालून “विटंबना छोटी गोष्ट” आहे म्हणणाऱ्या हा बाटगा मुख्यमंत्री पदावरून हाकलून द्यावा व त्याची पक्षातून हकालपट्टी करून त्याला “शिवनेरी” वर महाराजासमोर नाक घासायला लावून देशाला आपण शिवद्रोहाची शिक्षा काय असते दाखवून द्यावे.
यावेळी निषेध नोदवण्यासाठी काळी रिबीन डोक्याला बांधण्यात आली.
यावेळी नविन नाशिक मधील बाळासाहेब गीते,आशिष हिरे,विजय पाटिल, संजय भामरे,आबा पाटिल,योगेश गांगुर्डे,पंकज पाटिल,
सुयश पाटिल, सुजित देशमुख,शुभम महाले,कल्पेश पाटिल,मनोज हांडे,सुमित मोरे,मयूर शिंदे, प्रितेश पाटिल,महेश चव्हाण आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.