भाजीपाला व दूध विक्रेता यांना जनता कर्फ्यू मधुन मुभा देण्यात यावी भाजपा तालुकाध्यक्ष यांची मागणी

प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर तालुक्यात आज सुरू झालेल्या जनता कर्फ्यु नागरीकानी जरी प्रतिसाद दिला असला तरी भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांनी जनता कर्फ्यू चा फटका भाजीपाला व दूध विक्रेता यांना फिरण्यासाठी दोन तास वेळ देण्यात यावा अशी आपल्या निवेदनात केली आहे भाजीपाला व दूध हे मानवी शरीराला आवश्यक आहे तरी आपण त्याना विकासासाठी रोखले तर नागरिकांना त्याचा त्रास होईल व दूध विक्रेत्याचे मोठें नुकसान होताना दिसत आहे आज त्या दुध व भाजीपाला विक्रेत्यांला उदरनिर्वाह करण्यासाठी दुध विकल्याशिवाय भाग नाही गेल्या एक वर्षापासून सतत लाॅकडाऊन मुळे अर्थिक संकटात छोटा व्यासाय करणारा अडचणीत सापडला आहे एकीकडे सावकारी कर्ज व दुसरी कडे हे जनताकर्फ्यु जीवन त्याचे तबोला बनुन राहीलेले आहे नाही कोणती मदत दिली जाते नाही त्याचा विचार केला जातो कोणत्याही घटकांचा विचार न करता नाही कधी ज्याच हातावर पोट आहे त्याला कधी विचारलं का की तुझा व्यवसाय दहा दिवस बंद ठेवला तर तुला अर्थिक मदत करावी लागेल का अशा प्रश्न विचारला असता तर नाही हे हे उत्तर आलं नसतं त्यामुळे आपण नगरपंचायतचत च्या हादीतील सर्व भाजीपाला व दूध विक्रेता यांना विकण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे त्यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी शहरं अध्यक्ष खंडू चव्हाण राम जाधव वामनराव मिराशे विनोद दुर्गेकर माधव कदम गणेश सुर्यवंशी नितीन मुधोळकर परमेश्वर सुर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते