हे नामवंत वकील लढणार जितेंद्र भावे यांची केस …

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक

टीम ऑपरेशन हॉस्पिटल चे कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या विरुद्ध हॉस्पिटल विजन ने काल कर्मचाऱ्यांना धमकवल्या प्रकरणी तसेच अर्वाच्य भाषेत बोलल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतर 15 जणांवर ही गुन्हे दाखल केले गेले आहेत या प्रकरणी जनते मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय अशातच आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते असलेले जितेंद्र भावे यांच्या सोबत पक्षाने उभे राहून प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट असीम सरोदे हे जितेंद्र भावे आणि इतर 15 जणांविरुद्ध असलेले गुन्ह्यात कोर्टात यांची बाजू मांडणार आहेत असे आप चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले आहे. भावे सरांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्या मध्ये समाधान व्यक्त केले जात आहेत आणि भांडवलदार हॉस्पिटल आणि प्रशासनाला चांगलाच धडा या केस मधून मिळेल अशी आशा कार्यकर्ते करत आहेत.