साधारण मार्च महिन्या दरम्यान नाशिक येथील महात्मा नगर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते, पहिल्याच पावसात हा रस्ता उखडून गेल्यामुळे आज आप पक्षातर्फे सदर रस्त्याची देव ठेकेदार व प्रशासनास सद्बुद्धी देऊन चांगला रस्ता बनवावे अशी जितेंद्र भावे यांच्या हस्ते आरती ओवळण्यात आली.
रस्ता डांबरी करण्याच्या वेळेस फोटो सेशन करणारे लोकप्रतिनिधी आज रस्ता खराब झाल्यावर मूग गिळून गप्प का बसले आहे. प्रशासन ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांचे डांबराच्या दलालीत हात इतके काळे झाले की यांचे दोन दोन कोटीचे बंगले तयार झालेत व हे लोक 50 लाखाच्या गाड्या कसे घेऊन फिरतात याची चौकशी करण्यात यावी.
एका स्क्वेअर फूट ला डांबर चा नगर पालिकेच्या दराने किती खर्च येतो त्याप्रमाणे ह्या रास्तला किती खर्च झाला व हा वाया गेलेल्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार, भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी ठेकेदार व प्रशासन अधिकारी यांच्या कडून हा संपूर्ण खर्च वसुल करावे अशी मागणी आम आदमी पक्षा चे सुमित शर्मा यांनी केली आहे.
यावेळी जितेंद्र भावे, सुमित शर्मा, संजय कातकाडे, मंगेश काठे, सतीश सांगळे, विनायक येवले, जगबिर सिंग, सतीश असावरे, सुरज पुरोहित, नवींदर अहलुवालिया व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.