नाशिक शहरात 12 तारखेपासून दहा दिवसाचे कडक लॉक डाऊन,फक्त हॉस्पिटल व मेडिकल सुरू

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

नाशिक शहरात 12 तारखेपासून दहा दिवसाचे कडक लॉक डाऊन.
हॉस्पिटल व मेडिकल वगळून सर्व
अस्थापना राहणार बंद.
पेट्रोल पंपावर फक्त अत्यावशक सेवेच्या वाहनांना मिळणार पेट्रोल व डीजल.
औद्योगिक वसाहत सुद्धा राहणार बंद.
फक्त इंहाऊस असलेल्या वसाहतींना मिळणार परवानगी.
महापालिकेच्या कोविड सेंटर व रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. कडक लॉकडाउन झाल्यास किमान कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. वारंवार सांगूनही नागरिक नियमांची पालन करताना दिसत नाही व संसर्गाचे व्याप्ती वाढत आहे त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना लॉकडाउन गरजेचे झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.