नाशिक मध्ये भाजप ला मोठा धक्का वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा शिवसेनेत

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक

भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष असलेले वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा शिवसेनेत , खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित प्रवेश झाला.या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नाशिक ची राजकीय समीकरणे बदलण्याची चित्रे दिसू लागली आहेत. वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा नाशिक शहराच्या राजकारणात प्रभाव असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. वसंत गीते यांनी नुकत्याच एका मिसळ पार्टी चे आयोजन केले होते तेव्हा शिवसेनेचे महानगर प्रमुख तसेच इतर शिवसेना नेते आणि पूर्वी मनसेतून भाजप मध्ये गेलेले अनेक नगरसेवक या पार्टी ला उपस्थित होते तेव्हाच राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या गेल्या होत्या. आज अधिकृत पणे प्रवाशाने पुढील समीकरणे कशी बदलणार हे पाहणे औत्सुक्याच ठरेल.