
प्रतिनिधी:अभिजित चव्हाण,नाशिक
नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील नाशिकरोड येथील संदीप गजानन तितारे यांना पैशाचे आमिष देण्यात आले. दरम्यान, त्यांची एचडीएफसी पॉलिसीच्या नावाखाली ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली.
फिर्यादी संदिप गजानन तितारे (वय,३४) हे प्लॉट नं. ०२, गुरुधारा सोसायटी, शाहूनगर नाशिकरोड येथे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी अशोक महाजन, रोहन, प्रिया शर्मा, प्रतिभा शर्मा,सुभाष यांनी फिर्यादी महाजन यांना फोनद्वारे संपर्क केला. तसेच पैशाचे आमिष दाखवून एचडीएफसी पॉलिसी क्रमांक १४७६२९५६ च्या नावाखाली वेळोवेळी महाजन यांच्याकडून पैसे उकळले. दरम्यान महाजन यांना ७ लाख ३० हजार एवढी रक्कम मिळेल. असे आमिष देऊन वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी आरोपी यांनी फोन करून महाजन यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपये उकळून फसवणूक केली. सदर गुन्ह्यांची नोंद उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
