
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
जिल्ह्याच्या आढावा बैठकी मध्येय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा. कोरोणामुळे 8-9 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक गोंधळ तयार झाले आहेत, मुलांच्या क्लासेस चा तसेच शाळांच्या फी संदर्भात, वाढीव फी संदर्भात आशा अनेक समस्या आता समोर येऊ लागल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्या गेल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे झालेल्या आढावा बैठकीत शाळा या जानेवारीपर्यंत बंद च ठेवण्याचा निर्णय झाला होता आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळांनी पुणे मुंबई तसेच इतर शहरात कशाप्रकारे शाळांचे व्यवस्थापन प्रशासनाने केले याचा अभ्यास करून पुढील पाऊले उचलण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
