नाशिक शहरात कडक लॉकडाउन असताना मात्र रेल्वे स्टेशन वर मात्र सर्व मोकाट…

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक

संपूर्ण शहरात जिल्हाधिकार्यांनी शनिवार रविवार कडक बंद घोषित केला आहे संपूर्ण शहरात तो पाळलाही जात असून रेल्वे स्टेशन वर मात्र कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारले जात नाही आहे कोणीही ये जा करू शकत आहे.
प्रवेश द्वारावर रेल्वे कर्मचारी बसलेले तर आहेत पण कुठल्याही प्रकारची चौकशी करण्याची तसदी न घेताना दिसत होते. शहरात पाच स्ट्रेन सापडल्याची चर्चा मागच्या 2 दिवसापासून सुरू होती तरी देखील खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळून आले.