के.बी.एच.विद्यालय पवननगर येथे लोकनेते व्यंकटराव हिरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

दिनांक 24 एप्रिल 2022, रविवार रोजी के.बी.एच. विद्यालय, पवननगर येथे मुख्याध्यापक श्री.आप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची 93वी जयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला अधिकारी वर्गाने प्रतिमेचे पूजन केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती हर्षा कानडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कै.व्यंकरराव भाऊंविषयी माहिती दिली.
कार्यक्रमासाठी आर.बी.एच.प्राथ.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता काकळीज, के.बी.एच. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ.युगंधरा देशमुख, पर्यवेक्षिक श्री.उमेश देवरे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक बंधुभगीनींनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थिती लावली
सूत्रसंचलन श्री.प्रदिप हिरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री.किशोर भारंबे यांनी केले.