प्लास्टिक मुक्ती दिनाच्या निमित्ताने पृथ्वीची तुला प्लास्टिक ने…

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक

लोकहीत महाराष्ट्र नाशिक च्या group ला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LY8Gdhff1LyCgc4gEuBfuA

नाशिक मध्ये पर्यावरण आणि शिक्षणावर काम करणाऱ्या मानव उत्थान मंच या सामाजिक संस्थेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील प्लास्टिक मुक्ती दिनाच्या निमित्ताने जनते मध्ये अनोख्या पद्धतीने प्रबोधन केले आहे.
आपल्या कार्यकर्त्याच्या मदतीने पृथ्वी ची प्रतिकृती बनवून सोबत विविध वस्तू आणि पदार्थांचे पॅकेट एका भव्य तराजूत ठेऊन प्लास्टिक चा वापर कसा वाढतो आहे आणि वातावरणाला हानी पोहोचवतो आहे हर दाखवण्याचा प्रयत्न केला. या भव्य तराजू साठी संस्थेचे कार्यकर्ते दोन दिवसांपासून तयारी करत होते.

महापालिका आयुक्तांनी हजेरी लावून शहरातील नागरिकांना प्लास्टिक चा वापर टाळण्याचे आवाहन केले आहेया कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक जगबिर सिंग, पंकज जोशी, तेजस सोनार, निशिकांत पगारे इत्यादी उपस्थित होते.