
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक
छडवेल कोर्डे,ता साक्री, जिल्हा धुळे, या गावात डी.डी.सी बँकेत काम करणाऱ्या नामदेव वंजी बच्छाव कर्मचाऱ्याने बॅंकेतील भिंतीवर लावलेली हिंदू समाजाचे श्रध्दास्थान गुरुदत्तांच्या प्रतिमेला काढून टाकून त्या प्रतिमेवर बूट घालून उभं राहून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या त्याविरोधात निषेधार्थ व त्या विषारी वृत्तीच्या माणसांवर कडक कारवाई करून शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पिंपळनेर विभागाच्या वतीने पिंपळनेर पोलीस ठाणेचे P.S.I मा. हांडोरे साहेबांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान पिंपळनेर विभागाचे धारकरी शुभम सूर्यवंशी ,युवासेना उपशहर अधिकारी मयूर नांद्रे,अश्विन भिलाने, मंगेश अहिराव, दीपक शाह इत्यादी धर्मप्रेमी उपस्थित होते.
