
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
आज पहाटे नाशिक च्या इगतपुरी मध्ये 22 जणांना रेव्ह पार्टी करतांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
इगतपुरीस्थित असलेल्या मानस रिसॉर्ट च्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर पोलिसांनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला आणि 10 पुरुष व 12 स्त्रिया अशा 22 जणांना ताब्यात घेतले तसेच तिथून ड्रग्स आणि काही पैसे देखील जप्त करण्यात आले आहे, या मध्ये साऊथ अभिनेत्री, काही कोरिओग्राफर तसेच एक बिग बॉस मध्ये स्पर्धक राहिलेल्या अभिनेत्री आणि एक परदेशी महिलेचा समावेश आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
