कोरोना लसीकरण केंद्र वाढून मिळण्याबाबत शिवसेना,(पिंपळनेर शहर) तर्फे निवेदन

प्रतिनिधी:सुमित शर्मा, पिंपळनेर

पिंपळनेर / एक मे पासून शासनातर्फे १८ वर्षांवरील नागरीकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कोविड-19 वरील लसीकरण मोहीम ही पिंपळनेर शहरातील लोकसंख्येच्या आधारावर लसीकरण केंद्र वाढवून मिळणे बाबत पिंपळनेर तहसील कार्यालयात तहसीलदार अशोक उचाळे व ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहणे यांना आज शिवसेने तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख उदय भाऊ बिरारी,उपशहर प्रमुख बबलू भाऊ पुराणिक, वाहतूक सेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर भाऊ पगारे,विभागप्रमुख मनोज भाऊ खैरनार,युवासेना उपशहर अधिकारी मयुर भाऊ नांद्रे,संदीप भाऊ नहीरे, मा.शहरप्रमुख अतूलभाऊ चौधरी,उपशहर प्रमुख महेश वाघ,युवासेना शहर अधिकारी दीपक भाऊ साळुंके,उपशहर अधिकारी पवन सोनवणे, दिनु अहिरराव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.