
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील रहिवाशी तथा झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विदयालयाचे शिक्षक मोहन बोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रावेरी गावातील मित्रपरिवारांनी ग्रामपंचायतीच्या परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.वाढदिवस, कुठल्याही प्रकारचा देखावा न करता पर्यावरणाचे महत्व समजून घेऊन गावात केलेल्या वृक्षारोपणामुळे या आदर्श ग्राम रावेरी येथे निश्चितच एक वेगळा पायंडा पडून गावाला आदर्श बनविण्यास उपयोगी पडणार असून हा उपक्रम राबविण्यासाठी रावेरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन झोटिंग आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी यांनी हा आगळावेगळा वाढदिवस साजरा केल्यांने गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
