

प्रतिनिधी:उमेश पारखी,चंद्रपूर
चंद्रपूर: 14 जून जागतिक रक्तदातादिनाचे औचित्य साधून आज राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजक संस्था व रक्तदाते यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले होते.ज्यांनी कोरोना काळात रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या केले व सामाजिक दायित्व जपले त्या सर्व संस्थांचा व रक्तदात्यांचा भव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला.यात नाते आपुलकीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते समाजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ उपरे तसेच 58 वेळा रक्तदान करणारे दैनिक महासागरचे जिल्हा प्रतिनिधी श्री.जीतेंद्र मशारकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपूरचे पालकमंत्री मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री महाराष्ट्र शासन तथा चंद्रपूरचे विद्यमान आमदार मा.किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती.संध्याताई गुरनुले, जिल्हाधिकारी मा. श्री.अजय गुल्हाने, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे डॉ सोनकुसरे, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर चे डॉ. निवृत्ती राठोड, रक्तसंक्रमण अधिकारी सामान्य रुग्णालय चंद्रपूर डॉ. अनंत हजारे या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती.
