तळमळीचे युवा उपसरपंच निकीलेश चामरे यांचा सत्कार

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा

जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई आणि रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वैच्छिक रक्तदान चळवळीस प्रेरक रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजक संस्थांचा भव्य सत्कार समारंभ चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.दी.१८ जून रोजी शुक्रवारला आयोजित या कार्यक्रमात ग्रामपंचायत ताडाळी येथील सामाजिक परिवर्तनाची जाण असलेले तळमळीचे युवा उपसरपंच निकीलेश चामरे यांचा स्मृतिचिन्ह,प्रशस्तीपत्र आणि वृक्षभेट देऊन जिल्हा परिषद चंद्रपूर अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या हस्ते सत्कारमय गौरव करण्यात आला.निकीलेश चामरे यांनी ताडाळी गावात सुराज्य जनजागृती युवाक्रांती संघटना चंद्रपूर आणि नेहरू युवा केंद्र संयुक्त विद्यमाने कोरोना काळात गरजूंना रक्ताचा तुटवडा भासत आहे हे लक्षात येताच माणूस म्हणून स्वतचं एक सामाजिक दायित्व समजून रक्तदान शिबीर आयोजित केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संचालन रक्त संक्रमण अधिकारी अनंत हजारे यांनी केले.प्रमुख अतिथी उपस्थिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार,आमदार किशोर जोरगेवार,जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,डॉक्टर भास्कर सोनारकर यांनी निकीलेश च्य सामाजिक कार्याबद्दल आढावा लक्षात घेऊन कौतुक केले.