
राजुरा –
शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य मोबदला देणाऱ्या राजुरा-गडचांदूर मार्गावरील
कापनगाव येथील प्रतिष्ठित सालासर जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये अष्टमीच्या शुभ
मुहूर्तावर काटा पूजन करून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. कापूस
घेऊन येणारे कापनगाव व सोनुर्ली येथील सघनशील शेतकरी लक्षण येल्लुरे,
सचिन कोहपरे व गणेश चौधरी यांचे गंधक लावून तर बैलांचे व वाहनांचे गंधक
पुष्प अर्पण करून स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाला
6500 रुपये भाव देण्यात आला. यावेळी जिनिंगचे संचालक नवल राजेंद्रप्रसाद
झंवर, दीपक राजेंद्रप्रसाद झंवर, राहुल शंकर झंवर, अंकित झुंबरलाल मणियार
उपस्थित होते.
