एस टी विभागीय आगारात कर्मचाऱ्यांनी केली तेरवी,13 कर्मचाऱ्यांनी मुंडण करून कृती समितीचा केला निषेध

एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज तेरा दिवस पुर्ण झाले असुन चंद्रपूर विभागीय कार्यालयात संतप्त कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन करून कृती समितीचा निषेध केला आहे. 
सविस्तर वृत्त असे की, नियमित वेतन मिळावे, 15000 रुपये दिवाळी बोनस मिळावा, दिवाळी अग्रिम रक्कम मिळावी, एस टी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे ईत्यादी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी कृती समिती स्थापन करून राज्यभर उपोषण आंदोलन सुरू केले होते.
मात्र मुंबई येथे बसलेल्या कामगार नेत्यांनी शासनाबरोबर वाटाघाटी करून आंदोलन मागे घेतले मात्र कर्मचार्‍यांना तो निर्णय मान्य नसल्याने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान काल चंद्रपूर येथिल विभागीय कार्यालयाने राज्यात सर्वप्रथम आदेश काढुन 14 कर्मचार्‍यांना निलंबित केले व राज्यात एकुण 376 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. 
येत्या काही दिवसात इतर ठिकाणच्या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता आहे. आज मुंबई येथे मंत्रालयावर कर्मचारी मोर्चा नेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील विविध आगारात आंदोलन सुरू आहे.
ह्याचाच भाग म्हणुन चंद्रपूर विभागीय आगारात मुंडण आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनात 13 कर्मचाऱ्यांनी मुंडण करून कृती समितीचा तेरावा घातला असल्याचे कर्मचाऱ्यांनी चांदा ब्लास्ट सोबत बोलताना सांगितले आहे. हा निषेध शासनाचा नसून कृती समितीने कर्मचाऱ्यांचा केलेल्या विश्वासघाताचा असल्याची भावना कामगार नेत्यांनी व्यक्त केली असुन एस टी महामंडळाचे शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचेसुद्धा सगितले