
कोविड १९ मुळे भरकटलेल्या मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर व्यक्तीमत्व विकास व्हावा आणि त्यांच्या सप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील अभिप्रेरणेच्या माध्यमातुन स्वनियंत्रित कृतीला बळकट करण्यासाठी रामनगर कॉलनीतील गार्डन मध्ये प्रा. फाऊन्डेशन पुणे येथील बौद्धिक अक्षम (दिव्यांग) मुलांची संस्था तर्फे “दिवे रंगविणे” हा नवोउपक्रम सौ. राखी बोराडे चंद्रपूर यांच्या सहकार्यातुन नुकताच राबविण्यात आला.
या उपक्रमात एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ५० सर्वसाधारण व तर राजुरा तालुक्यातर्गंत ८ दिव्यांग विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना “दिवे रंगविणे” या उपक्रमांसाठी दिवे, रंग, ब्रश चा पुरवठा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामनगर कॉलनीच्या प्रतिष्ठित लता चांडक, मीना चांडक यांची उपस्थिती लाभली.
उपक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वरूपा झंवर, सचिव शुभांगी वाटेकर, कल्याणी मोहरिल, प्राची चिल्लावार, अर्पिता नामवार, राधा विमलवार, वृषाली बोनगिरवार, रोशनी झंवर, कल्याणी गुंडावार, ज्योती जावरे, कृतिका सोनटक्के, अर्चना शिंदे, प्रणिता धाबे तसेच शिक्षक तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
