

राजुरा:पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांनी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले ..
लॉकडाऊन मुळे अनेक ठिकाणी केरकचरा, प्लास्टिक जमा झालेला होता. प्लास्टिक मुळे मृदा प्रदूषण व इतर होणाऱ्या हानी लक्षात घेऊन युवकांनी कुसळ येथील हजरत हाजी अ. रहमान उर्फ दुल्हणशाह बाबा दर्गाह येथे स्वच्छता मोहीम राबवत वृक्ष लागवड केली ..
दर्गाह परिसर स्वच्छ करत अनेक मुस्लिम समाजातील लोकांना स्वच्छता व वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. या करिता त्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमात श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा राष्ट्रीय सेवा योजना पथकचे स्वयंसेवक प्रतीक डाखरे, शाहिद शेख, व एन.एस.एस.ओ. संघटना चे युवक कोरपना तालुका अध्यक्ष अफरोज शेख सोबतच दर्ग्याचे ख़ादिम मोहम्मद आसिफ, मकसूद खान, ताहेर शेख , कुणाल जगताप , अयान शेख या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
