प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा

राजुरा: पाचगाव त.राजुरा येथील गरीब शेतकरी श्री.वासुदेव मारोती जुनघरे यांचे एका रस्ता अपघातात निधन झाले होते,तीन लहान लहान मुले आणि म्हातारे आई वडील असणारे वासुदेव हे कुटुंबाचे एकमेव कर्ते पुरुष होते,पश्चात गरीब कुटुंबाची वाताहत होऊ नये आणि त्यांना स्वतःच्या बळावर उभे राहावे यासाठी खैरे कुणबी समाज राजुराकडून वासुदेव यांच्या कुटुंबाला रोख रक्कम आणि मुलांना शैक्षणिक साहित्य सांत्वनपर मदत म्हणून देण्यात आले.
राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.अरूणभाऊ धोटे यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी खैरे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.वासुदेवराव चापले, कोषाध्यक्ष मा.विलासभाऊ चापले, सचिव डॉ.अनिल चौखुंडे तसेच संस्थेचे पदाधिकारी कुणाल कुडे,ऍड.मारोतिभाऊ कुरवटकर,श्री.रामरतनजी चापले,दशरथजी भोयर व गावातील समाजबांधव उपस्थित होते.
