खुशखबर:आता थेट गोवा जाता येणार,बल्लारशाह स्टेशन वरून करता येणार प्रवास

गोवा मध्ये असलेले प्रमुख पर्यटन स्थळे

समुद्रकिनारे

कोलवा

दोना पावला (Dona Paula)

मिरामार (Miramar)

कळंगुट (Calangute)

हणजुणे (Anjuna)

पाळोळे (Polem)

वागातोर (Vegator)

हरमल

आगोंद

बागा

मोरजी

अभयारण्ये

भगवान महावीर अभयारण्य, मोले

बोंडला अभयारण्य

खोतीगाव अभयारण्य

सलीम अली पक्षी अभयारण्य, चोड

दूधसागर धबधबा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना गोवा जाण्यासाठी व्हाया मुबंई जावं लागतं होत .त्यात वेळ व आर्थिक भुर्दंड प्रवाश्यांना बसत होता.रेल्वे मंत्रालयाने गोवा राज्यातील वास्को द गामा या स्टेशन पर्यंत थेट जाण्यासाठी रेल्वे गाडी क्र.06398 ही गाडी आठवड्यात एकदा गोवा स्पेशल ट्रेन जसिद(झारखंड) या स्टेशन वरून सुरू होणार राऊरकेला,बिलासपूर ,रायपूर, गोंदिया, बल्लारशाह,मंचेरीयल,काजीपेठ,सिकदराबाद या सर्व स्टेशन वरून जात वास्को द गामा(गोवा) या अंतिम स्टेशन पर्यंत जाणार आहे.चंद्रपूर जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बातमी रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.