वडकी येथील रबनुर किराणा स्टोअर्स मध्ये 15 हजाराची चोरी.अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

वडकी येथील बसस्थानक चौकात असलेल्या रबनुर किराणा स्टोअर्स मध्ये 15 हजार 210 रु चोरी झाली असून ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद वडकी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
वडकी येथील बसस्थानक चौकात छोट्या उड्डाणपुलाजवळ जाकीर हैदरखा पठाण यांच्या मालकीचे रबनुर किराणा अँड जनरल स्टोअर्स या नावाने दुकान असून नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारला सायंकाळी 4 वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते.दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी त्यांच्या किराणा दुकानाचे लोखंडी शटर एका बाजूने लोखंडी लॉकनट तोडून व अर्धवट शटर वाकवून दुकानाचे आत प्रवेश केला व दुकानातील लाकडी ड्रावर मध्ये ठेवून असलेले ठोक व चिल्लर नगदी 13 हजार रु जुना मॉयक्रोटेक कंपनीचा इंव्हीटर की 1500 रु तसेच सोयाबीन तेलाने भरलेली प्लॅस्टिकची कॅन की 710 रु असा एकूण 15 हजार 210 रु च्या मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.जाकीर पठाण हे शुक्रवारी सकाळी दुकान उघडायला गेले असता सदर हा प्रकार त्यांना उघडकीस आला.या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.विशेष म्हणजे चोरट्यानी मुख्य चौकातील दुकानांना लक्ष करून पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.आता पोलिसांनी या चोरट्यांचा मुसक्या आवळण्याची गरज आहे.याप्रकणी जाकीर हैदरखा पठाण यांच्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार रमेश मेश्राम सह किरण दासरवार करीत आहे.