
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
शिवरामजी मोघे आदिवासी आश्रम शाळेत कार्यरत असलेले श्री.सुमेध बागेश्वर सर यांना आदिवासी प्रकल्प विभागाअंतर्गत देण्यात येणारा अतिशय मानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.
पुसद प्रकल्प विभागाअंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांना हा बहुमान बहाल केला जात असतो.
पुरस्कृत शिक्षक हे शिक्षकी पेशामध्ये उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी मोलाचे भरीव कार्य करण्यात आपली जबाबदारी समजून कार्य करतात असे मत सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.
शिक्षक हे समाजामध्ये उत्तम भविष्य निर्माण करणाऱ्या हातांना मजबूत करण्याचे कार्य निरंतर करीत असतात.
नेर(परसोपंत) येथे हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व सन्माननीय मंडळींनी व शाळेच्या संचालक मंडळींनी व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी या पुरस्काराबद्दल सन्माननीय शिक्षकांचे अभिनंदन केले.
