देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत विदर्भावाद्याकडून घोषणाबाजी

  • Post author:
  • Post category:वणी

वणी नगर पालिकेनेच नव्यानेच उद्यानाचे निर्माण केले आहे त्याचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भाच्या घोषणा देण्यात आल्या.वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा,लेकरं रहेंगे लेकर रहेंगे विदर्भ राज्य लेकरं रहेंगे अश्या घोषणाबाजी केल्या देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या आंदोलनात अनेक वर्षी होती त्यांनी विदर्भवाद्यसोबत आमगाव ते खामगाव यात्रा काढली होती मात्र सत्ता मिळताच देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या जनतेशी बेईमान झाले त्यामुळे विदर्भावद्यानी आज त्यांच्या विरोधात त्यांच्याच सभेत घोषणाबाजी केली यावेळी देवराव धांडे,रफिक रंगरेज,राहुल खारकर,संजय चिंचोळकर,दशरथ पाटील,मंगेश रासेकर,देवा बोबाटे,आनंदराव पानघाटे,अनंता मोहितकर यांच्यासह विदर्भवादी उपस्थित होते.