
मारेगाव | आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभेत मनसेत जोरदार इनकमिंग चालू झाली. काल वणी तालुक्यात आणि आज मारेगाव शहरासह, तालुक्यातील सिंधी, कुंभा, महागाव, मार्डी, कोलगाव, घोडदरा,गोंडबुराडा,भालेवाडी,धामनी, पहापळ,केगाव,खंडणी,सालई पोड, अर्जुनी,कुंभा,खडकी,केगाव (मार्डी),चिंचमंडळ येथील शिवसेना आणि इतर सर्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यप्रणीलावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला. मारेगाव येथील बदकी भवनात काल भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून मारेगाव तालुक्यातील असंतुष्टी शिवसैनिकांनी व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश घेतला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रमेश सोनूले,तालुका उपाध्यक्ष गोविंदराव थेरे, शहर अध्यक्ष शेख नबी, महिला तालुका अध्यक्ष आरती राठोड, शहर अध्यक्ष सिंधुताई बेसकर,युवा सरपंच शुभम भोयर, अनंत जुमळे, अविनाश लांबट, संतोष राठोड,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष लाभेश खाडे, चांद बहादे, मा. आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार, बंडू एसेकर ,प्रविण डाहुले, अजिद शेख, शशीकांत बोढे, किशोर मानकर,विजय रोगे,चंद्रकांत धोबे,भष्कर धुळे , लाभेश खाडे चांद बहादे,निखिल मेहता,जम्मू सय्यद, संकेत पारखी, अजय वासेकर यांच्या सह असंख्य महाराष्ट्र सैनिक व मारेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते……
