मजुराचा मुलगा बनला नायब तहसिलदार ,बौद्ध विहारामध्ये राहुल राऊत यांचा सत्कार


कळंब (माथा) माता रमाई परिसरा मधे अत्यत गरीब भूमीहीन शेत मजुरामधे जन्म झालेला राहुल नरेश राऊत हा मुलगा एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेत यश संपादन करून नायब तहसीलदार झाल्यामुळे मा.तहसिलदार सुनिल चव्हान सर, अशोक उमतकर, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वादी संघटना एकत्र येऊन तथागत नगर येथील तथागत बुद्ध विहारांमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी कु.पद्मजा रणजीत मून वर्ग 10 वा,आदित्य रवी थोरात वर्ग 10 वा , कुमारी श्रुती विजय बुरबुरे वर्ग 12 वी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राहुलच्या वर्ग चारच्या वर्गशिक्षिका विजया येलेकर मॅडम यांनी आपले विचार मांडताना राहुल हा मुळातच हुशार विद्यार्थी आहे.त्याकरिता त्यांचे आई वडिलांचे मुख्य योगदान असल्याचे मान्य करावे लागेल. तसेच त्यांनी पुढे असे म्हटले की, “राहुल तू माझे डोळे मिटण्यापूर्वी कलेक्टर हो आणि मला कलेक्टर झालेले तुला पाहायचे आहे” असे भावनिक उद्गार काढून त्याला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कारमूर्ती राहल राऊत यांनी सत्काराला उत्तर देते वेळेस मलांनी संपादीत केलेले यश हीच वडिलांचे सर्वात मोठी संपती असून पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे. गाड्या पैसा हे आपण शिक्षण घेतल्यावरही कमावू शकतो. शिक्षणामुळेच आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळत असते. या सत्कार प्रसंगी मला प्रामुख्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी दिलेला संदेश म्हणजेच समाजाला न्याय देण्यासाठी राजकीय जमात बना किंवा शासकीय जमात तरी बना त्या माध्यमातूनच तुम्ही समाजाला न्याय देऊ शकता. राजकीय जमात बनण्यासाठी राजकीय पाठबळ असणे आर्थिक पाठबळ असणे अतिशय महत्त्वाचे परंतु माझ्यामागे कोणतेही राजकिय पाठबळ नसल्यामुळे मी शासकीय जमातीमध्ये सामील व्हावे म्हणून माझ्या वडिलांनी दिलेल्या प्रेरणेनुसार मी अहोरात्र अभ्यास करून हे यश संपादन केलेले आहे त्यामुळे माझे आई-वडिलांनी माझ्यावर विश्वास दाखविला . माझे आई वडील पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना मला जी आर्थिक मदत केली खरोखर ते कार्य प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांसाठी करून त्यांच्या यशामध्ये सहभागी व्हावे . मी माझ्या आई-वडिलांचे खूप खूप आभारी आहोत. तसेच माझ्या यशामध्ये रोकडे सर(IRS)यांचेही मला खूप मार्गदर्शन लाभले. माझे मामाजी प्रकाश थोरात , शंकर मुजमुले काकाजी यांनी सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन करत गेले.,मित्रांनी, समाजाने, मला वेळोवेळी मार्गदर्शन करून माझा उत्साह वाढवत गेले . त्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी निरंजन फुलकर सर,ओमप्रकाश भवरे यानी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंजन फुलकर प्रमुख अतिथी मालाताई सुरदुसे (नगर सेविका) ,सागर समुद्रे (नगरसेवक), विजया येलेकर (शिक्षिक),मधुकर खैरकार हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा कळंब, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, भिम टायगर सेना, पंचशील भीम मंडळ तथागत नगर कळंब, तक्षशिला बुद्ध विहार माता रमाई परिसर कळंब (माथा) , रोमंत पाटील, रवी वानखडे,पंकज लढे, सचिन भगत, बरोबर महेंद्र बालवीर , रत्नाकर भगत,विठ्ठल चंदनखेडे,शुभम पिसे, रत्नाकर भगत, पियुष जवादे, सचिन भगत,नारायण बुरबुरे, विजय थोरात,विजय बुरबुरे, दिलीप इंगळे, चंद्रमणी भेले,संघपाल इंगळे, गोलू
हिवरे, नितेश थोरात, कार्यक्रमाचे प्रस्ताविक नारायण बुरबुरे यांनी केले.सूत्रसंचालन सुगत नारायणे यांनी आभार स्वाती इंगळे यांनी केले.