
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
हटवांजरी या आदिवासी लोकवस्तीसाठी मंजूर झालेल्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते.या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासना कडुन दिरंगाई होत असताना शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हटवांजरी येथील नागरिक बुरांडा येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेत रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकन्यात आले आहे.
तालुक्यातील हटवांजरीच्या आदिवासी पोडावर जाण्यासाठी रस्त्याची समस्या निर्माण झाली होती.ही समस्या कायम मार्गी लावण्यासाठी शासनाने रस्ता डांबरीकरणा करीता मंजुर केला होता
मात्र या रस्त्याचे डांबरीकरण होवु नये यासाठी येथील काहीनी अडथळा निर्माण केला होता.हा अडथळा दुर करावा या प्रमुख मागणीसाठी स्थानिक प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा निवेदने देण्यात आलीअसताना कमालीची दिरंगाई झाली होती. दु्र्लक्षीत झालेल्या या समस्ये कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हटवांजरी येथील नागरिकांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलनचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले होते.या निवेदनाची गंभीर दखल घेत तात्काळ येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. रास्ता खुला करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डाँ. शरद जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीपक पूंडे,नायबतहसीलदार अरुण भगत, ठानेदार राजेश पूरी, अभियंता सुहास अचलेवार, सार्वजनिक बंधकामचे अभियंता आसुटकर,भूमिअभिलेख विभागाचे उपाधिक्षक बबन सोयाम, आदिनी अमलबजावनी केली या करवाइचे ग्रामस्था मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
