
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
घाटंजी तालुक्यातील आमडी येथील शेतकरी अंबादास निकम यांच्या बैलाचा खाली पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन बैल मरण पावल्या ची घटना घडली आहे
शेतकरी अंबादास निकम हे नेहमी प्रमाणे आपले बैल चारण्यासाठी शेतात जाऊन परत येताना दुपारच्या चार वाजता चे सुमारास तूटुन पडून असलेल्या विद्युत तारेचा स्पर्श बैलाला झाला व तो जागेवरच मरण पावला असून शेतकर्यांचे जवळ पास अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने या बाबत सदर शेतकर्यांनी विज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना माहिती दिली व पोलीस स्टेशन घाटंजी यांनाही माहिती दिली आहे आदीच शेतकऱ्यांवर अनेक नेसर्गीक संकटे येत असताना विज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणा मुळे बैलाचा जिव गमवावा लागला आहे.
