लाच घेताना अडकला भगवान शामराव मेश्राम पोलिस स्टेशन राळेगांव च्या बिट जमादारांची यांची चांदी च चांदी?


तीन पोलिस कर्मचारी लाच घेताना सापळ्यात अडकले
अवैध धंदे सुरुच?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

पोलिस स्टेशन राळेगांव च्या हद्दीत अवैध धंदे फोफावले आहे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अवैध धंद्यात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात बंदी घातली असून राळेगाव तालुक्यात मात्र या बंदीला काही बिट जमादार यांनी दुजोरा दिला आहे माझे सुरळीत कर आणि तुझे बरोबर चालू दे असे वाक्य ऐकायला मिळत आहे…
पोलिस स्टेशन राळेगांव मध्ये दोन वर्षात तीन पोलिस कर्मचारी लाच घेताना सापळ्यात अडकले आहेत.
वाहतूक शिपाई सलीम पप्पूवाले,शालीक लडके आणि आता बीट जमादार भगवान शामराव मेश्राम घे हे तीघे लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे धाडीत पकडल्या गेलेंत.आणि अवैध धंदे सुरुच असल्याचा हा पुरावा नाही का?
काही च दोष नसताना दोन तत्कालीन ठाणेदारां ची उचलबांगडी जिल्हा पोलिस प्रशासनाने केली होती हे विशेष.
अशातच दिंनाक २४ मे रोजी राळेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाडगाव हे तालुक्यात मोठे गाव येते या गावाचा बिट अंमलदार म्हणून कार्यरत असलेला जमादाराने एका गुन्ह्यात दोन हजाराची लाच मागितली यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली त्यावरून सापळा रचून या लाचखोर जमादाराला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले . भगवान शामराव मेश्राम असे लाच घेताना सापडलेल्या जमादाराचे नाव आहे लोणी बंदर येथील अदाखल पत्राच्या गुन्ह्याचा तपास भगवान शामराव मेश्राम यांच्याकडे होता आरोपीला संरक्षण देण्यासाठी त्याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली या संदर्भात एसीबीचे निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली या तक्रारीची एसीबी पथकाने पडताळनी केली त्यानंतर मंगळवारी सायंकाळी राळेगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात सापळा लावण्यात आला पंचासमक्ष जमादार भगवान शामराव मेश्राम यांनी लाच स्विकारल्याचे मान्य केले त्यावरून एसीबी पथकाने मेश्राम यांना तात्काळ ताब्यात घेतले रात्री उशिरा पर्यंत जबाब नोंदविन्याची कार्यवाही सुरू होती यासंदर्भात राळेगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे ही कारवाई उप अधीक्षक शैलेंद्र सपकाळ यांच्या वतीने पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट ,महेश वाकोडे आदिंनी केली आहे.