अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या (मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी )

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

९ जुलै शनिवार ला झालेल्या ढग फुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची सुद्धा पडझड झाली आहे. त्यामुळे शासनाकडे झालेल्या नुकसानीची तत्काळ सरसकट भरपाई देण्यात यावी तहसीलदार साहेब राळेगाव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुका अध्यक्ष शैलेश आडे, वाहतूक सेना अध्यक्ष आरिफ शेख, शहर अध्यक्ष प्रतीक किरटकर, संदीप कुटे, विनायक सरोदे, धीरज गाऊत्रे, कल्लू पठाण,अमर येलेकार, महेश येलेकार, राहुल गाऊत्रे,विठ्ठल शेंडे,अखिल शेख, मनोज मेश्राम, राजू मेश्राम यांच्या सह मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.