वर्धा नदीच्या पात्रातून अवैध रेतीचे उत्खनन ,शासनाचे दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

तालुक्यातील वान्हा, रामतिर्थ, जागजई, या रेती घाटावरून लाखो रूपये किंमतीच्या अवैध रेतीचे उत्खन्नन राजरोसपणे सुरू आहे. विशेष बाब म्हणजे शासनाने तालुक्यातील कुठल्याही रेतीघाट हर्रास झाला नसतांना मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खन्न होत आहे. ही रेती तस्करी शहर व ग्रामिण भागात बांधकामाला नेल्या जात आहे. या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा करोडो रूपयाचा महसूल डुबत असून संबंधीत विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे हा सर्व प्रकार मुग गिळून बसून संबंधीत विभाग पाहत आहे.

या रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने तस्करांची चांदी झाली आहे या वर्षी वध नदीच्या पात्रात निसगीने मुबलक रेती आणून टाकली आहे. घारीची नजर असलेल्या रेती तस्करांनी काही दिवस जात नाही तोच डाव साधून उत्खनन सुरू केले आहे.रामतीर्थ बारा, धर्मपुर जागजाई मुदापूर, कारेगाव, झुल्लर या रेती घाटात मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. वध नदी चे पात्र वध व यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेले हे पात्र आहे. दोन्ही जिल्ह्यातील रेती तस्कर या नदीपात्रातून लाखोची रेती दरवर्षी चोरून नेतात. काही दिवसा पर्यंत अल्लीपूर पोलीस स्टेशनचे पोलीस रामतीर्थ कापसी या रेती घाटापर्यंत यायचे त्यांचा वचक या तस्करांवर चांगलाच होता, काहींवर मोठी कारवाई ही वर्धा जिल्ह्यातील या पोलिसांनी राळे गावातील रेती तस्करांवर केलेली आहे. परंतु खबऱ्याच्या माध्यमातून अल्लीपूर पोलिसांवर नजर ठेवून रेती तस्कर रात्रीच्या वेळेस रेतीची तस्करी करत असल्याची माहिती आहे. यावर राळेगाव तालुक्यातील प्रशासनाचा कुठलाच इन्ट्रेस्ट असलेला दिसत नाही रेती घाटा लगत असणाऱ्या गावामध्ये जे तलाठी आहे ते पूर्णतः निष्क्रिय असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळेस
रामतीर्थ पर्यंत पोलीस गस्त नसल्याने व पोलिस त्या मार्गाने गेले तर टप्प्या टप्यावर उभ्या असणाऱ्या खबऱ्याच्या माध्यमातून ही माहिती घाटात असणाऱ्या रेती तस्करा पर्यंत पोहोचल्याने कारवाई करिता एकही टू क्टर नदीपात्रात सापडत नाही.

राळेगांव शहरातील माऊली पार्क मधील एका बांधकामावर दिनांक २९ नोव्हेंबरच्या रात्री सात ट्रॅक्टर चालकांनी टाकल्याची माहिती आहे शहरातील तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचान्यांनी नवीन बांधकामाना भेटी दिल्या का व रेती कुठून आली हे तरी त्यांना विचारले का असे शहरात कुठेही दिसत नाही. शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक ही महत्त्वाची पदे आहे. परंतु यांचेच लागेबांधे तस्करांशी असल्याने त्यांचे नेहमीच फावत आहे. काही होमगार्ड म्हणून काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचारी यांनी रेती तस्करी करण्याकरता ट्रॅक्टर घेतल्याची खमंग चर्चा आहे.. रेती तस्कर तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या आजूबाजूलाच नेहमी बावरत असलेले दिसतात काही दिवसांपूर्वी अल्लीपूर पोलीस स्टेशन व हिंगणघाट तहसीलदारांनी रेती तस्करांवर मोठी कारवाई करून शासन दासरी लाखोंचा महसूल दंडाच्या स्वरूपात दिलेला आहे. परंतु राळेगाव तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत • असलेली दिसून येत आहे. यात काही आर्थिक व मधुर संबंध तर झाले नसेल ना याचाही संशय व्यक्त होत आहे.

रेती तस्करीच्या माध्यमातून चोरटे मालामाल झाले असून महसूल पोलीस कर्मचान्यांशी अरेरावी करण्याच्या घटना फारशा जुन्या झालेल्या नाही हे त्यांच्या लक्षात यायला पाहीजे. आम्ही पैसा देतो त्यामुळे आमचे काही होणार नाही अशी भूमिका तस्करांची आहे. पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन कारवाई करणे व तस्करीला आळा घालने महत्त्वाचे आहे. यामुळे शासनाला करोडो रुपयांचा महसूल मिळाल्याशिवाय राहणार नाही.